ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉलर्स सर्च अकॅडेमी व ज्यू कॉलेज कोरपना येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना :- येथील सर्च फाऊंडेशन, चंद्रपूर संचालित स्कॉलर्स सर्च अकॅडेमी व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 27 जानेवारी 2024 ला नुकताच उत्साहात पार पडला. ‘स्पर्श -2024’ या विषयावरील कार्यक्रम सादर झाले तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कोरपना येथे 20 वर्षांपासून स्कॉलर्स सर्च अकॅडेमी व ज्यू कॉलेज, कोरपना ज्ञानदानाचे कार्य करीत असून या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेत आहेत. सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून आपले नाव उज्ज्वल करावे, असे बक्षीस वितरणाच्या अध्यक्षीय भाषणातून शाळेचे संस्थापक इंजि दिलीप झाडे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटक श्री विजय धानोरकर सरपंच- कातलांबोडी, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमाकांत मालेकार, श्री रमेश मालेकार, श्री बोन्डे सर प्राचार्य वसंतराव नाईक विद्यालय,कोरपणा, श्री दिगांबर खडसे सर माजी प्राचार्य वसंतराव नाईक विद्यालय कोरपना,श्री भाऊराव खडसे सर प्राचार्य चटप आश्रम शाळा कोरपना, श्री प्रभाकर लोडे, श्री दिनकर ढवस, श्री नारायण झाडे शाळेचे प्राचार्य राहुल उलमाले यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. गोंडी नृत्य , लोकनृत्य, कोळी नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.

सहाय्यक प्राध्यापिका कु. करिष्मा बांगडे यांनी शाळेची प्रगती तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले विशेष प्राविण्य याची माहिती दिली.

स्कॉलर्स सर्च अकॅडेमी,कोरपना येथील विद्यार्थी यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक प्राप्त केला म्हणून सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्राध्यापिका प्रणाली खडसे व ललित वाघमारे तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सांभाळली.

त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलन या मध्ये चालू वर्षातील झालेल्या सर्व कार्यक्रमाचे बक्षीस वितरण संस्थेचे संस्थापक इंजि दिलीप झाडे, श्री संजय ठावरी माजी प्राचार्य वसंतराव नाईक विद्यालय कोरपना, कुंदा झाडे, मीनानाथ पेटकर यांचा उपस्थीत मध्ये झाले.तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये