ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत नवीन भाजी मंडईवर पोलिसांची धाड

जुगार खेळणारे ९ जण ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती शहरातील नवीन भाजी मंडई परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा व भद्रावती पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत ३ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना १४ जुलै २०२६ रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली होती की, नवीन भाजी मंडई परिसरात काही इसम पत्त्यांवर पैशांची हार-जीत लावून जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. घटनास्थळावरून ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून ५ मोटारसायकली, ८ मोबाईल फोन व रोख रकमेसह एकूण ३,५२,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८३/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी तसेच स्थानिक गुन्हे शाखा व भद्रावती पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये