ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगडच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांद्वारे विविध उपक्रम राबवत आहेत,ज्यात गावातील लोकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. हे लक्षात घेऊन धन्वंतरी प्रकल्पांतर्गत दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी जिवती तहसील येथील पिट्टीगुडा क्र. 1. पंचायत कार्यालयाच्या आवारात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सी.एस. आर. अंतर्गत केले. एकूण 250 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला यामध्ये गावातील पुरुष, महिला, वृद्ध व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी पिट्टीगुडा पोलीस ठाण्याचे पी. एस. आय. श्री सुशील सरकार, सरपंच श्री बाबुराव पवार, उपसरपंच तानुबाई जाधव, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर संगीता जाधव, आश्रम शाळेचे शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिक निखिल पवार, सुनील पवार उपस्थित होते. या शिबिरात महिला व मुलींना विशेषत: मासिक पाळीसोबत तोंडाच्या, गर्भाशयाच्या व स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले तसेच 200 सॅनिटरी पॅडचेही वाटप करण्यात आले. टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या टीमसह अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड येथील डॉक्टरांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन हे शिबीर यशस्वी केले.

या शिबिरादरम्यान पी.एस.आय.श्री.सुशील सरकार यांनी गावातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिबिराचे कौतुक केले व या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी माणिकगड युनिटचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये