ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसच्या वतीने भटक्या जाती जमाती मुक्तिदिन साजरा

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

इंग्रजांच्या काळात भटक्या जातींना कायम गुन्हेगारी ठरविण्याचे कायदे करण्यात आले होते. या कायद्याच्या कचाट्यातून काढण्याचे काम पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 31 ऑगष्टला केल्याने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावली येथील कार्यालयात मुक्तिदिन साजरा करण्यात आला.

इंग्रज काळात लढवय्या असलेल्या भटक्या जातीं जमातींना चोर, लुटेरे असे गुन्हेगारी प्रवृत्तीची जात ठरवून गुन्हेगारी जमाती कायदा १९७१ कायदा केला. हा क्रूर कायदा भटक्या जाती जमातीवर अन्याय करणारा असल्याने या शोषित जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याची संधी देत हा कायदा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रद्द केले. या क्रूर कायद्यातून मुक्त केल्याने भटक्या मुक्त मुक्ती दिन देशभर साजरा केल्या जातो. सावली काँग्रेसच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुक्तिदिन साजरा करण्यात आला.

यावेळी चंद्रपूर जिल्हा भटक्या जाती जमाती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी सभापती पं.स. सावली मा.विजय कोरेवार, सावली तालुका महिला काँग्रेस कमीतीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार, नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर, महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे, नगरसेवक मा.प्रितम गेडाम, नगरसेविका सौ.अंजली देवगडे, सौ.ज्योती गेडाम, सौ.पल्लवी ताटकोंडावार, माजी ग्राम पंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख व सोशल मीडिया तालुका अध्यक्ष मा.कमलेश गेडाम, बादल गेडाम, राजू कंचावार, भारत मराठे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये