Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

थकीत वेतन देयकासाठी प्राथमिक शिक्षकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

देयके न मिळाल्यास साखळी उपोषण : प्राथमिक शिक्षक संघटनेचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       पंचायत समिती भद्रावती अंतर्गत कार्यरत तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या थकीत वेतन देयके न निघाल्यामुळे एकदिवसीय धरणे आंदोलन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती भद्रावती तर्फे दिनांक 3/ 10/ 2024 रोज गुरुवारला करण्यात आले.

    शासन निर्देशानुसार व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी नक्षलग्रस्त व आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित कर्मचारी सदर क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत 15 % प्रोत्साहन भत्ता व कमाल 1500 रुपये व एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ अनुदेय आहे. असे पत्रक दिनांक 28 जुलै जुलै 2023 ला निर्गमित केले .

    तसेच या संदर्भाने माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर व माननीय मुख्य लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे स्पष्ट निर्देश व पत्रक असताना स्थानिक पंचायत समिती येथील वित्त विभाग व शिक्षण विभाग यांनी मात्र सदर आदेशाला केराची टोपली दाखवीत थकीत देयके तयार करतांना व तपासणी करतांना व प्रत्येक वेळी नवीन सूचना सांगून शिक्षकांना नव नवीन कागदपत्राची मागणी करीत आहेत.

     या संदर्भाने माननीय गटशिक्षणाधिकारी यांची वारंवार संघटनेने भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला परंतु याबाबत अपेक्षित कार्य झाले नाही तसेच माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांनीही या संबंधाने सूचना देऊन ही कामाला गती आली नाही .वित्त विभाग व शिक्षण विभाग हेतू परस्पर देयकांची अडवणूक करून शिक्षकांना थकीत वेतन देयके मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा निंदनीय प्रकार सुरू आहे.

         पंचायत समिती भद्रावती अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांचे सहाव्या, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, नक्षल भत्ता थकबाकी, वेतन निश्चिती थकबाकी व आदिवासी एक स्तर वेतन थकबाकी इत्यादी समस्या प्रलंबित असून

संबंधित सर्व देयके दिनांक 5 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन शालार्थ प्रणालीत सादर करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.

        प्रशासनाने उचित दखल न घेतल्याने तालुका संघटनेला पंचायत समितीच्या समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करावे लागले.

    या आंदोलनाला शिक्षक आमदार माननीय सुधाकरजी अडबाले साहेब हे उपस्थित राहिले . अधिकारी सर्व शिक्षकांसमक्ष समस्या निवारण सभा घेतली या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करित

संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघाडणी केली व प्रशासनाला 100% थकीत देयके निकाली काढावे असे कठोर निर्देश दिले.

      यावेळी संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य महिला अध्यक्ष अलका ठाकरे ,जिल्हा अध्यक्ष किशोर आनंदवार ,जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर,जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, उपाध्यक्ष जीवन भोयर , दिवाकर वाघे ,लक्ष्मण खोब्रागडे,सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणपत विधाते, बंडू हनवते तसे तालुका संघटनेचे सर्व पुरुष व महिला तथा तालुक्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  तसेच पुढील काळात देयके न निघाल्यास साखळी उपोषण करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये