Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जय महाराष्ट्र श्री दुर्गा उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी नंदलाल शर्मा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील महात्मा ज्योतिराव फुले चौकात १९८५ ला जय महाराष्ट्र श्री दुर्गा उत्सव सार्वजनिक मंडळाची स्थापना झाल्यापासून कोणताही खंड न पडता 38 वर्षाची परंपरा कायम ठेवत या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात श्री दुर्गा उत्सव साजरा करण्याचे मंडळाचे वतीने निश्चित करण्यात आले असून यावर्षी या श्रीदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्षपदी सेवानिवृत्त शिक्षक नंदलाल शर्मा यांची तर सचिव पदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जगदीश कापसे यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे.

 शहरातील पूर्वीच्या जुनी नगरपरिषद चौक नावाने ओळख निर्माण झालेल्या व आता या चौकाचे नामकरण होऊन महात्मा ज्योतिराव फुले चौक म्हणून ओळखले जाते या चौकात 1985 ला शहरातील सर्वप्रथम सार्वजनिक दुर्गा उत्सव साजरा करण्यापूर्वी या ठिकाणी जय महाराष्ट्र श्री दुर्गा उत्सव मंडळ या नावाने संस्थापक माजी नगरसेवक वसंत अप्पा खुळे व माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे यांनी पुढाकार घेऊन मंडळाची स्थापना केली व अखंडितपणे गेल्या 38 वर्षांपासून या ठिकाणी श्री दुर्गा उत्सव साजरा करण्यात येत आहे हे 39 वे वर्ष असून या दुर्गा देवीची ख्याती शहरासह पंचक्रोशीत असून नवसाला पावणारी ही देवी आहे अशी या देवीची ओळख निर्माण झालेली आहे व ज्या ज्या देवी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे असे अनेक भक्त दरवर्षी बाहेरगावाहून खास करून या देवीच्या दर्शनाला आवर्जून येतात हे विशेष…

यावर्षी जय महाराष्ट्र श्री दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकारणी निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 2024 च्या जय महाराष्ट्र श्री दुर्गा उत्सव सार्वजनिक मंडळाचे अध्यक्षपदी सेवानिवृत्त शिक्षक नंदलाल शर्मा तर सचिव पदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जगदीश कापसे उपाध्यक्षपदी कामगार नेते मोतीलाल सुनगत कोषाध्यक्षपदी माजी नगरसेवक वसंतअप्पा खुळे सदस्य गोविंदराव झोरे, नंदन खेडेकर, दिपक बोरकर, राम कापसे,दीपक मल्लावत, कल्याण चांडगे,सन्मती जैन, विठ्ठलराव खांडेभराड,पत्रकार सुषमा राऊत,अरुण कायस्थ,सचिन व्यास,प्रवीण रोडे, मनोहर सपाटे, श्याम गुजर, राजेश तायडे ,शिवाजी वाघ,राजू खांडेभराड ,दीपक पिंपळे, मोरेश्वर मिनासे,संतोष पिंपळे, मोहन खांडेभराड यांची निवड करण्यात आली आहे, दरवर्षी या मंडळाचे वतीने उत्साहात धार्मिक व आरोग्य विषयक कार्यक्रम घेत उत्सव साजरा करण्यात येतो, या वर्षी सुद्धा विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये