Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवा शेतकरी कैलास नागरे राज्यस्तरीय आधुनिक युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शिवणी आरमाळ येथील युवा शेतकरी श्री कैलास अर्जुनराव नागरे यांनी शेतीत केलेल्या उत्पादन वाढीसाठी नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे आणि शेतीतील विविध स्तुत्य उपक्रम आणि उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांचा पुरोगामी महाराष्ट्रात आधुनिक”युवा शेतकरी”म्हणून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचा विभागीय सर्वोच्च पुरस्कार .महामहीम राज्यपाल महोदय मांननिय श्री सी पी राधाकृष्णन्, मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे,मा.उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, मा.कृषिमंत्री श्री धनंजय मुंढे,मा.कृषी सचिव जयश्री भोज भा.प्र.से. मा.कृषी आयुक्त श्री रविंद्र बिंनवडे भा.प्रं.से.यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मधील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया(डोम) वरळी,मुबंई येथे दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता हा कार्यक्रम झाला.कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबददल त्यांना सन 2020 चा एकमेव पहिला सर्वोच्च “युवा शेतकरी”पुरस्कार अमरावती विभागातून प्रदान करण्यात आला आणि सपत्नीक कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

हा पुरस्कार हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून, मातीत झिजलेल्या त्या सर्व खुरांचा,पायांचा, हातांचा,बौद्धिक,शारीरिक,मानसिक,श्रमचां/मातीत शेतीत कष्ट उपलेल्या त्या प्रत्येक घामाझुकुळ चेहऱ्याचा/ मातीत दीन रात राबणाऱ्या त्या सर्व शेतमजूर,शेतकरी बंधू भगिनींचां शेतीमातीपाण्याशी निगडित विविध शासकीय निमशासकीय विभागांचा,सहकाऱ्यांचा,सल्लागारांचां,मार्गदर्शकाचां आहेत असे कैलास नागरे यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये