Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चकपिरंजी येथे अँपल बोर व आंबा कलमीकरण प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली :- देवासाळी शेतकरी उत्पादक कंपनी व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने मौजा चकपीरंजी येथे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अनिल स्वामी यांचे शेतावर परीसरातील शेतकरी, कृषि कर्मचारी व तरुणांना गावरान बोर व आंबा रोपांवर सुधारित अँपल बोर व आंब्याचे कलमीकरण करण्याचे व फळाबाग लागवड बाबत तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षणात बोरिवरील रिंग बडींग,पॅच बडीन व आंबा पिकावरील पाचर कलम बाबत मंडळ कृषि अधिकारी दिनेश पानसे यांनी तांत्रिक माहीती देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले तशेच माग्रारोहयो अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना फळाबाग व बांबू लागवडीबाबत प्रशिक्षणात तांत्रिक माहीती देण्यात आली.

प्रसंगी अनिल स्वामी यांनी शेतकऱ्यांना स्वतःचे आंबा फळबागेचे अनुभव विषद करून फलोत्पादक पिके लागवडीतून विकास सादण्याचे व तरुणांनी कलमीकरणाचे कौशल्य अवगत करून रोजगार करण्याचेव आव्हान केले.

  प्रशिक्षणास कृषि पर्यवेक्षक सचिन जाधव,कृषि सहाय्यक प्रदीप जोंधळे,पवन ठाकरे, योगेश टेकाडे, लक्ष्मी ढोंगे, अक्षय ठीकरे तशेत परिसरातील शेतकरी व तरुण यांनी उपस्थित राहून प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये