Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भोई, मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

मुल येथे भोई समाज बांधवांचा स्नेहमिलन व सत्कार सोहळा

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर क्षेत्रातील मच्छीमार बांधवांसाठी घरकुल तसेच त्यांना जमिनीचे पट्टे उपलब्ध करून देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांच्या व्यवसायात मदत करणे, व्यवसायात सुलभता आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. भोई, मच्छीमार समाजबांधवांनी त्यांच्या अनेक मागण्या मांडल्या आहेत. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुल येथे महर्षी वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्थद्वारे भोई समाज बांधवाच्या स्नेह मिलन व सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग समितीचे सदस्य अमोल बावने, वाल्मीकी म.पा संस्था मुल चे अध्यक्ष जितेंद्र टिंगूसले,अमित चवले, पांडूरंगजी गेडाम,विजय कस्तूरे, किशोर टिंगूसले,लक्ष्मण ठाकरे, यादव,गणेश गेडाम,अरूण मेश्राम, सपना भोयर, सुखदेव कोल्हे,प्रमोद मानकर, राजेंद्र मेश्राम, चरणदास शेडमाके, हरीदास गोहणे, रूषी पेटकर, दिलीप ठाकुर, सचिन मेश्राम, मुरलीधर गेडाम, बालाजी शिंदे, श्रीरंग जराते, नंदकिशोर गदेकार, गजानन गेडाम, सुधीर बोरूले, मुकुल वाघाडे, सुरेश केसुरकर, प्राणनाथजी राजबंशी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुल येथे महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावाने गेटची उभारणी करण्यात आली. बल्लारपूर क्षेत्रात विमुक्त आणि भटक्या जमाती बांधवांसाठी वर्षभरात ४ हजारपेक्षा जास्त घरकुलांना मंजूरी देण्यात आली. मुल येथील विविध समाज बांधवाकडून जमिनीच्या पट्ट्यासंदर्भात अर्ज मागविण्यात आले होते. त्यात ८०० पेक्षा जास्त बांधवांनी अर्ज केले असून या बांधवांना जमिनीचे पट्टे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मच्छीमार बांधवांकरिता भुजल जलाशयातील मासेमारी समाजाच्या विकासाकरीता भुजल कल्याणकारी महामंडळाची स्थापना, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई, प्रति हेक्टरी १५०० किलो मत्स्य उत्पादनाची अट शिथिल करणेबाबत, एकात्मिक जलाशयीन मत्स्यव्यवसाय विकास प्रकल्पातंर्गत दिलले कर्ज माफी, नायलॉन सूत जाळे, डोंगे खरेदी वरील अनूदान आदी विषय मार्गी लावण्यासाठी निवेदने प्राप्त झाली. मच्छीमार सोसायट्यांचे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी समाजाच्या प्रतिनिधींची मुंबई येथे बैठक घेऊन सदर बैठकीत मच्छीमार बांधवांना दिलासा देण्याचे काम करण्यात येईल. मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक येत्या चार दिवसात करण्यात येणार असल्याचे ना.श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील गोरगरिबांची सेवा करण्याचा संकल्प केला असल्याचे ना.मुनगंटीवार यांनी नमूद केले. बल्लारपूर मतदार क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी जीव तोडून काम केले. विविध विकास कामांमुळे मुल शहराचे रुप पालटले त्यामुळे आज मुल शहराचे नाव गौरवाने घेतले जाते. शहरातील क्रीडा स्टेडियम, जलतरण तलाव, शाळा बांधकाम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, कन्नमवार सभागृह, इको पार्क, तहसील कार्यालय, पंचायत समिती इमारत, सिमेंट रस्त्यांचे बांधकाम, आदिवासी वसतीगृह तसेच पाणीपुरवठा योजनांची कामे पुर्णत्वास आली यावेळी ना.श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. देशगौरव,प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य, उज्वला गॅस योजना, जनधन बॅंक खाते, आयुष्यमान भारत योजना लागू केली. शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र व राज्यशासनाचे एकूण १२ हजार रूपये थेट देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यात थेट १५०० रूपये देण्याचा निर्णय घेतला. महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत दिली. युवकांसाठी लाडका भाऊ योजना आणली. उज्वला योजनेअंतर्गत तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पिवळे रेशनकार्ड धारकांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता पिवळे रेशनकार्ड धारकांना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मच्छीमार बांधवांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी तसेच या क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले.

विरोधी पक्षात होतो तेव्हाही…

विरोधात असताना देखील लोकांच्या मागण्यांसाठी संघर्ष केल्याचे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विरोधी पक्षात असताना मुल येथील कन्नमवार सभागृह विधिमंडळ आयुधांचा वापर करून पूर्णत्वास नेले. श्रीराम मंदिर तसेच संसदेचा प्रत्येक दरवाजा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून पाठविलेल्या लाकडापासून निर्माण झालेला आहे. बल्लारपूर विधानसभेला पुनश्च: गौरव प्राप्त झाला असून पंतप्रधान कार्यालयाच्या ऑफिसचे काम बल्लारपुरच्या सागवानापासून तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पंतप्रधानांची खुर्ची देखील बल्लारपूरच्या लाकडाची असेल. तसेच द्विपक्षिय वार्ता सभागृहातील फर्निचर देखील बल्लारपूरच्या लाकडापासून निर्माण होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले. ३०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करून ३६ जिल्ह्यांमध्ये बचत गटाचे कर्ज वितरणात चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये