Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडीलांसह पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह पिंजर येथील आपत्कालीन पथकाने काढले शोधून

मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची दमदार कामगीरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव चिलमखा येथील,दीपक प्रल्हाद निकाळजे वय (29) वर्ष हे आपला मुलगा अर्थव दीपक निकाळजे वय 5 वर्ष याला घेऊन जवळ खेड येथील नाल्यावरुन मोटारसायकल ने जात असताना ते मोटारसायकल सह 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी दोघे बाप लेक वाहून गेले थोड्याच अंतरावर नाल्यात त्यांची दुचाकी मिळुन आली तेव्हापासून शोध मोहीम चालु केली असता दोन दिवस उलटुन गेले परंतु काहीच मिळुन आले नाही शेवटी सिंदखेड राजा चे उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी 27 सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्य़ातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण करण्यात आले.

रात्रीच जिवरक्षक दिपक सदाफळे यांचेसह त्यांचे सहकारी मयुर सळेदार,शेखर केवट, धिरज राऊत,निलेश खंडारे, मयुर कळसकार,महेश वानखडे,अश्विन केवट, निखील बोबडे,यांचेसह रेस्क्युबोट शोध व बचाव साहित्यासह 28 सप्टेंबर रोजी सकाळीच 5:00 वाजता घटनास्थळावर पोहचले असता उ.वि.अ. संजय खडसे यांचे आदेशाने तसेच तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे सोबत सर्च ऑपरेशन चालु केले घटनास्थळावरून जवळखेड नाला ते आमना नदीत 12 की.मी.पर्यंत पायी चालत शोध मोहीम राबवित असताना दुपारी दीड वाजता चींचोली गुरुकुल येथील आमना नदीत अथर्व याचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले बाहेर काढून दिला नंतर तेथुनच पुढे दोन की.मी.अंतरावर गोंधन खेड येथील आमना नदीत वडिलांचा मृतदेह सापडला यावेळी पुर्ण दिवस भर सोबत असलेले सिंदखेड राजा उ.वि.अ. संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसिलदार. संतोष मुंडे, मंडळ अधिकारी रामदास मान्टे, एन,एल,वायडे,तलाठी एस एम चिकटे,जे एस लोखंडे, विलास नागरे, पि,टी, जायभाये,कोतवाल विठ्ठल हरणे, जगन बुरकुल, सज्जन शेळके, पि,आर, देढे, देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले,हे.काॅ. काकडे,पोकाॅ चंदु साळवे, पो.काॅ. अभी ठाकरे,पो.काॅ. नंदकिशोर ईघारे, आणी बुलाढाणा पोलीस टीम सहभागी झाली होती व नातेवाईक सोबत होते अशी माहीती मंडळ अधिकारी मान्टे यांनी दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये