ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दारू प्यायला पैसे न दिल्याने डोके फोडून जीवे मारण्याची धमकी
आरोपीवर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दारू प्यायला पैसे न दिल्याने आरोपी ने फरशीचा तुकडा डोक्यात मारून जख्मी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता देऊळगाव मही येथे घडली.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी शाम भानुदास शिंगणे हा संदीप नंदू बकाल यांच्या दुकानात जाऊन मला दारू प्यायला पैसे मागितले, मात्र पैसे न दिल्याने आरोपी ने खाली पडलेला फर्शीचा तुकडा उचलून संदीप च्या डोक्यात मारून जखमी केले व बंदुकीने मारुन टाकण्याची धमकी दिली.
घटनेची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक सतिश नागरे करीत आहे.