Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर – शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वच्छता ही सेवा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा .डॉ. संजय गोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेचे फार मोठे योगदान आहे विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजे असे मत त्यांनी आापल्या मनोगतातून व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.शरद बेलोरकर यांनी केले याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. माया मसराम व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे आभार प्रा. डॉ सतिंदर सिंह यांनी मानले.

स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविले जात आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये