ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भूषण फुसे यांचे कोरपणा बस स्टॉप येथे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

27 सप्टेंबर रोज शुक्रवारला भूषण फुसे जनसंपर्क कार्यालय कोरपनाना बस स्टॉप येथे जनसामान्य जनतेच्या आशीर्वादाने उद्घाटन करण्यात आले व श्रीकृष्ण हॉलमध्ये महिलांना साडी वाटप करण्यात आले व कोरपणा बस स्टॉप ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली सुद्धा काढण्यात आली.

या रॅलीमध्ये भूषण फुसे यांनी वक्त बदल गया है अब बेटीया नही लडके मा बाप पर बोझ है अशी हातात स्लोगन बोर्ड घेऊन अनेकांचे लक्ष वेधले गावागावातून येणाऱ्या नागरिकांचे शाल श्रीफळ देऊन कार्यालय येथे जाहीर सत्कार करण्यात आला.

तसेच पत्रकार बंधू यांचे सुद्धा शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आले कोरपणा तालुक्यातील अनेक सिमेंट फॅक्टरी असून सुद्धा स्थानिकांना नोकरी पासून वंचित असल्यामुळे बेरोजगार यांना नोकरी देण्यात यावी बेरोजगार यांना रोजगार देण्यात यावे यासाठी कोरपणा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भूषण फुसे यांनी दिले.

यावेळी हजारोंच्या संकेत जनसमुदाय उपस्थित होते फुसे यांच्या रोजगाराविषयी खडे बोल बोलल्याने बेरोजगार युवकांमध्ये नवचतना जागृत झाली असून येणाऱ्या निवडणुकीत बेरोजगार युवक सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्याकडे आकूष्ट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये