ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निप्पान प्रकल्पग्रस्तांचे उद्यापासून साखळी उपोषण

धरणे आंदोलनाला माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिली भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    भद्रावती येथील तहसील कार्यालयासमोरील निप्पाण प्रकल्पग्रस्तांच्या धरणे आंदोलनाचा आज शेवटचा दिवस असून उद्यापासून याच ठिकाणी प्रकल्पग्रस्तांतर्फे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार असून सदर साखळी उपोषण हे 21 एप्रिल पर्यंत चालणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांतर्फे सांगण्यात आले. दरम्यान आज दिनांक पाच रोज शनिवारला भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांना भेट देऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली व या आंदोलनाला आपले समर्थन दिले आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना दिलासा द्यावा.

असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर शहरातील सर्व राजकीय पक्ष आणि संघटना यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रकल्पग्रस्तांनी सुद्धा प्रत्येक राजकीय पक्ष तथा संघटनांची मदत घेत आपले आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन केले. गेल्या अनेक दिवसांपासून निप्पान प्रकल्पग्रस्तांचे सदर धरणे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र या आंदोलनाकडे शासनाने पाठ फिरवल्याने उद्यापासून याच ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येत आहे.

प्रति एकर दहा लाख रुपये अनुदान, नोकरीची हमी व कंपनी, एमआयडीसी व प्रकल्पग्रस्त यांच्यात त्रिपक्षीय करार करणे या प्रमुख मागण्यांशिवाय अन्य मागण्या प्रकल्पग्रस्तांतर्फे शासनासमोर ठेवण्यात आल्या आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये