विकासाचे नावावर शहरातील सुविधांची ऐशीतैशी!
निधीचा दुरुपयोग, बॅनर फलकावर भर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नगर परिषद क्षेत्रात विकासाची गंगा आणि अच्छे दिन येतील हे आता दिवास्वप्न राहिले आहे. नगर परिषद क्षेत्रात अनेक योजना राबविल्या जात आहे. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात नियमितता असून काम दर्जेदार होत नसल्याने कामाचे तीन- तेरा वाजले आहे.
नियोजन शून्य कारभारामुळे विकास नावापुरता उरला आहे. अनेक भागात नाली आणि सिमेंट रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने अनेक शहरवासियाना त्रास होत असून पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने जागोजागी खड्डे आणि पाईप लाईन टाकल्याने आडवे रस्ते खोदले गेले आहेत.
यामुळे गावात पायदळ किवा वाहने चालविता ना अनेकांना गुडघ्याचा आजार होत असल्याचे ज्येष्ठ नागरिक बोलू लागले आहेत. नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या गावात नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याने मलेरिया सारख्या रोगाचे लक्षण दिसून येत असून नगर परिषदेचे याकडे लक्ष नाही. जनता या बोगस कारभाराला कंटाळली आहे असे चित्र दिसून येत आहे.