ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बॉम्बेझरी येथे अल्ट्राटेक माणिकगड तर्फे जाळी वॉलकंपाऊंड व प्रवेश गेटचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सी.एस.आर. कामांत चांगली वाटचाल करत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बॉम्बेझरी येथे मोकळ्या असलेल्या शालेय पटांगणाला जाळीचे वॉलकंपाऊंड व प्रवेश गेट बांधकामाचे भूमिपूजन आज ग्रामपंचायत सरपंच मनीषा पेंदोर यांच्या हस्ते नारळ फोडून व कुदळ मारून करण्यात आलेत.

या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वर्ग, विध्यार्थी,माणिकगड सी.एस. आर पथक व बॉम्बेझरी गांवातील नागरिक उपस्थित होते.

या कार्यामुळे शाळेतील विध्यार्थ्यांना सुरक्षा मिळेल व त्यांच्याकरिता खेळण्यासाठी एक मोठे पटांगण तयार होईल असे प्रतिपादन शिक्षक व नागरिकांनी कलेत तर सरपंच यांनी माणिकगड चे मनापासून आभार व्यक्त केलेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये