Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात वेस्ट ऑफ आर्ट स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे दिनांक २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण सेवा योजना विभागातर्फे स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या मोहिमे अंतर्गत वेस्ट टू आर्ट ही स्पर्धा घेण्यात आली.

याप्रसंगी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य मा. प्रफुल्ल माहुरे, रासेयो अधिकारी प्रा. प्रदिप परसुटकर, पसेयो अधिकारी प्रा. सचिन भैसारे, प्रा. प्रशांत पवार, प्रा. सुधीर थिपे,प्रा. आशिष दरेकर, प्रा. नरेंद्र हेपट, प्रा.संगीता पुरी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

या स्पर्धेचे परीक्षण प्रा.नंदा भोयर व प्रा. माधुरी पेटकर यांनी केले. या स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक प्रसराम चावरे, द्वितीय क्रमांक अंकृती पोतराजे, तृतीय क्रमांक अनुश्री सातपुते व प्रोत्साहन क्रमांक मनीषा देठेकर, ओम मंडलवार, समीक्षा गौरकर या विद्यार्थ्यांना देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये