Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सत्यशोधक समाजाच्या 151 व्या वर्धापनदिनाच्या औचीत्याने जनजागृती कार्यक्रम

संवैधानिक अधिकार व हक्काबाबत ओबीसी समाज अनभिज्ञ - नितीन चौधरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महात्मा ज्योतीराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या 151 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ओबीसी जनजागृती संघटन जिल्हा वर्धा द्वारा विठ्ठल रुक्मिणी सभागृह येथे ओबीसी समाजाच्या जागृती करीता प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. ओबीसी बहुजन समाजात वैज्ञानिक व चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या आजच्या काळातील आवश्यकतेबद्दल जागृती करण्याचा उद्देशाने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

या कार्यक्रमातील मुख्य वक्ते राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा चे अध्यक्ष नितीन चौधरी यांनी ओबीसी समाजाला त्यांच्या हक्क व अधिकार बाबत जागृत करणे आवश्यक असून ओबीसी समाज क्रिमिलेयर सारख्या पायाभूत माहितीत सुद्धा अनभिज्ञ आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना केल्याने त्यातून प्राप्त होणाऱ्या हक्काबाबत समाजात माहिती पोहचविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी उदाहरणासह विषद केले.

या कार्यक्रमाला माळी समाजाचे अध्यक्ष गौरव ओंकार, झाडे सुतार समाजाचे बंडूभाऊ भांदककर, प्रदिप कुहिटे व रिद्धी राहुल लेकुरवाळे उपस्थित होते. श्री प्रविण कडू यांनी अध्यक्षीय भाषणातून ओबीसी जनजागृती संघटनच्या सर्व सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून ओबीसी समाजात जागृतीचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

कार्यक्रमांत ओबीसी समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणारे सदस्य निरंजन वरभे, प्राजक्ता मुते, जयवंत भालेराव यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच समाजात एकजिनसीपणा येण्याकरीता आंतरजातीय विवाहाची आवश्यकता विचारात घेवुन ओबीसी समाजातील आंतरजातीय विवाह करून याकामी पुढाकार घेतलेल्या पाच दाम्पत्याचा भेटवस्तू व सन्मानचिन्ह देवुन गौरव कऱण्यात आला. व अशा आंतरजातीय विवाह केलेल्या वेगवेगळया पाच दांपत्याचा दरवर्षी सत्कार व गौरव करण्याचा मानस जाहीर करण्यात आला.

आमदार डॉ पंकज भोयर, डॉ अभ्युदय मेघे व डॉ. सचिन पावडे यांनी सुध्दा कार्यक्रमाला भेट देवुन आपल्या मनोगतातून ओबीसी जनजागृती संघटनच्या जनजागृतीच्या कार्याला शुभेच्छा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घपाट, प्रज्ञा चौधरी यांनी केले तर प्रास्ताविकात जनजागृती पतसंस्थेचे अध्यक्ष मनोहर खर्चे यांनी संघटन च्या कार्याबद्दल माहिती दिली. प्रशांत वाटाणे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थापक अजय भेंडे, रविंद्र चौधरी, उमेश गडधनी, सचिन वानखेडे, सूर्यप्रकाश पांडे, प्रमोद हांडे, प्रविण पेठे, नरेश धोटे, राजेंद्र इंगोले, अनिल भेंडे, मुकेश लूतडे, रंजीत सुरकार, नितीन ढोपटे, सुनिल वानखेडे, तुषार देशमुख, सोमता फुटाणे, सागर गावंडे, अजय वरटकर, विक्रम राऊत, राजेश माथनकर, रश्मी भेंडे, कोमल वाटाणे, हर्षा इंगोले, अनिता घपाट, मनीषा भेंडे, तुषार बाभुलकर यांनी परिश्रम घेतले. डॉ अशोक चोपडे, कपिल थुटे, राजेन्द्र कलसाईत, राहुल लेकुरवाळे, ओबीसी संघटनचे सदस्य विवेक वझरकर, निलेश भेण्डे, नरेंद्र नाकतोडे, महेंद्र लुंगे, जयंत पुसदेकर, नामदेव दुमने, गजानन वायगोकर, राहुल दुमणे यासह ओबीसी समाजाचे अनेक स्त्री पुरुष सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये