Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होली फॅमिली स्कूल ला व्हॉलीबॉल मध्ये जिल्हास्तरावर उपविजेता पद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नुकत्याच पार पडलेल्या 17 वर्षखालील मुले शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये होली फॅमिली स्कूल ला जिल्हा स्तरावर उपविजेता पद मिळाले तालुका स्तरावर विजेते पद मिळवून जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता पात्र ठरला

17 वर्ष वयोगटातील मुले यांही भद्रावती तालुका या संघा सोबत अंतिम सामना चुरशी चा झाला अवघ्या काही अंकानी या संघाला पराभवाचा सामना करावा लागला
तसेच निवड चाचणी मध्ये होली फॅमिली स्कूल चे 3 विद्यार्थी विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धे करिता निवड करण्यात आले.

त्या मध्ये सार्थक खोके, शोर्या पाटील व यश गुलबे यांची निवड येत्या 26 तारखेला होणाऱ्या विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा गडचिरोली साठी निवड झाली सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य सिस्टर दीपा यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले जिंकण्याचे सर्व श्रेय होली फॅमिली स्कूलच्या प्राचार्य व शारीरिक शिक्षक प्रितम चौधरी व जुही मॅडम यांना देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये