Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुसूंबी खदान कोलाम आदिवासी शेतकऱ्यानी बंद पाडली  

आंदोलन कर्त्याचा आक्रोश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

      गडचांदूर स्थीत मानिकगड सिमेंट च्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या कुसूंबी येथिल १८ आदिवासी कोलाम समाजाच्या शेतक ऱ्याचा संघर्ष १ दशकापासून सुरू आहे मात्र गरीब दारिद्रय जिवन जगण्याची नामुष्की या कुंटूबावर आली पोलीस प्रशासन महसुल कडे बोट दाखवून महसुल कडे प्रकरण देतात महसुल विभाग फक्त चौकशी व अहवाल मागविण्यात वेळ घालवून प्रकरण लोंबकळत ठेवल्याने बाधीत कुटूंबाने असंतोष निर्माण झाला अरवेर जमीनीच्या ताब्यासाठी स्वताच्या शेतात जाऊन उत्खनन सुरु असलेल्या ठिकाणी आज दि २३ /०९ / २०२४ ला आदिवासी महीला पुरुष राष्ट्रवादी कॉग्रेस च्या प्रदेश सहसचिव यांच्या नेतुत्वात ठिय्या आंदोलन बेमुदत साठी मांडला यामुळे खदानीचे उत्खनन व वाहतुक बंद पाडून आदिवासीच्या जमीनी वरील कंपनी अतिक्रमण हटविण्यात यावे आदिवासी कोलाम शेतकऱ्याना ताबा देण्याची मागणी धरूण आंदोलन सुरु केले.

बेकायदेशिर बळकाविलेल्या जमिन परत देण्यात यावे जमिनीचा मोबादला नुकसान भरपाई देण्यात यावी कोलाम आदिवासी जमीन घेतल्या परन्तु एक ही आदिवासी कोलामाना नोकरी दिली नाही स्थानिक लोकावर अन्याय कंपनीने केलेले आहे मानिकगड सिमेंट कंपनी च्या कुसूंबी नोकारी येथिल संपूर्ण जमीनीचे भुमापन मोजणी करण्यात यावे ३ / ०७ / २०१३ च्या बनावटी ग्रामसभा नाहरकत दाखवून १९०, ४२ हेक्टर जमीन संपादनास दाखल प्रस्ताववर जमीन ४ था टप्पा साठी आदिवासी शेतकऱ्याचा विरोध असल्याने व आक्षेप असल्याने ११ / ८ / २०२३ च्या ग्रामसभेच्या ठराव क्र १३ नुसार शासनाने कार्यवाही करूण आदिवासी क्षेत्रातील प्रस्ताव नामंजूर करा इत्यादी मागण्या घेऊन प्रकल्प बाधीत ठिय्या आंदोलनावर ठाम आहे.

यामुळे खदान परिसरात वातावरण तणाव पुर्ण असून ठानेदार शिवाजी कदम आपल्या ताफ्या सह पोलीस चोख बंदोबस्त केला आहे जिवती येथिल नव्यानेच रुजु झालेले तहसिलदार रुपाली मोबरकर नायब तहसिलदार सागर वाहने यांनी आंदोलन कर्त्याची भेट घेऊन आंदोलन थांबविण्याचा आग्रह केला मात्र आंदोलनकर्ते मागणी पुर्ण झाल्या शिवाय हटणार नाही अशी भुमिका घेतल्यामुळे त्याचे प्रयत्न असफल ठरले अरुण उद्दे भाऊराव कन्नाके जंगू पेंदोर केशव कुडमेथे रामदास मंगाम भिमा मडावी गणेश सिडाम रामकिसन आत्राम सह शेकडो आदिवासी आदोलनात सहभागी झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये