Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेडवाही येथील सरपंचासह कॉग्रेस व भाजप कार्यकर्ते शेतकरी संघटनेत

जीवती तालुक्यात शेतकरी संघटनेची जोरदार मुसंडी

चांदा ब्लास्ट

राजुरा विधानसभा क्षेत्रातील जीवती तालुक्यातील शेडवाही या आदिवासी व अतिदुर्गम ग्रामपंचायत चे कॉग्रेस पक्षाचे सरपंच सित्रूजी सिडाम यांचेसह काॅग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला रामराम करीत शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे संघटनेचा लाल बिल्ला लावून माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी स्वागत केले. यावेळी शेडवाही चे सरपंच सित्रू पाटील सिडाम यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. शेडवाही गुड्यावरील समाजमंदिरात झालेल्या या बैठकीला माजी जि.प. सभापती निळकंठराव कोरांगे, शेख इस्माईल, मधुकर चिंचोलकर, शब्बीर जागीरदार, यांचेसह जीवती तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

        या बैठकीत बोलतांना सरपंच सित्रूजी सिडाम म्हणाले की, गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात कॉग्रेस प्रणित आघाडी व सध्या भाजपप्रणित युती सरकार सत्तेत आहे. मात्र या दोन्ही युती – आघाडी च्या सरकारने शेतमालाच्या रास्त किंमत देण्याचे बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय केला. आमच्या आदिवासी भागात विकासकामांना प्राधान्य दिले नाही आणि याबाबत स्थानिक नेतृत्वाने आवाज उठविला नाही. त्यामुळे आता विधानसभेत ॲड. वामनराव चटप यांच्यासारख्या शेतकरी नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही सामूहिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवून शेतकरी संघटनेत प्रवेश केल्याचे सरपंच सित्रू सिडाम यांनी बोलतांना सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन त्यांच्या विचारांना सहमती दर्शवली.

       या सभेत शेडवाही येथील आमू पाटील सिडाम, हनुमंतू कन्नाके, बारीकराव गेडाम, माणिक सिडाम, माणिक कोहचाळे, चंदू सिडाम, मोतीराम सिडाम, मोतीराम आत्राम, मारोती उदे, बंडू कोडापे, राजू सिडाम, अमृत सोयाम, भिमराव उदे, रामू कुमरे, आनंद परचाके, मोतीराम सिडाम, देवराव गेडाम, भिमराव आत्राम, सोमू कन्नाके, गणपती कुमरे, संभाजी सिडाम यांचेसह अनेक काॅग्रेस व भाजप कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये