ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साखरी ग्रामपंचायतचे उपसरपंच दादाजी किनेकर अविश्वास ठरावाने अखेर पायउतार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. चंद्रशेखर प्यारमवार

ग्रामपंचायत साखरी येथील सरपंच यांचे निधन झाल्याने उपसरपंच व प्रभारी सरपंच पदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता, परंतु उपसरपंच पदावर कार्यरत असलेले दादाजी किनेकर यांनी मनमानी कारभार करणे,तसेच देवटोक हे तालुक्यातील मुख्य देवस्थान असून देखील विकास कामात आलकाटी आणणे
तसेच अधिकाराचा दुरूपयोग करून गावातील नागरिक याना सूडबुद्धीने नाहक त्रास देने तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचेवर दबाव टाकून त्यांना विचारात न घेता निर्णय घेणे अशाप्रकारच्या अनेक कारणांमुळे सिर्शी व साखरी येथील नागरिकानी व ग्रामपंचायत सर्व सदस्यानी ७ व ० अशा सर्वानुमते अविश्वास प्रस्ताव पारित करून अखेर उपसरपंच दादाजी कीनेकर यांना पायउतार करण्यात आले.या संदर्भात तहसिल कार्यालयाला एक आठवडाअगोदर पत्र देण्यात आले होते.आणि त्या आधारावर आज सावली तहसीलदार आर.आर.पाटील व हरांबा साजा चे तलाठी झिटे यांच्या समक्ष अविश्वासाचे ठराव पारित करण्यात आले. त्यामुळे गावातील नागरिकारमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

*संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे ९ जून ला सोपविला होता राजीनामा*
सावली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रमाणेच साखरी ग्रामपंचायतचे निवडणूक पार पडलेली होती. या निवडणुकीत भाजपा समर्पित पाच व काँग्रेस समर्थित चार सदस्य निवडून आलेले होते. सरपंच पद हे अनुसूचित जमाती राखीव होते. त्यामुळे या पदावर ईश्वरदास गेडाम हे सरपंच म्हणून तर उपसरपंच म्हणून दादाजी किनेकर यांची निवड करण्यात आली होती. निवड करत असतानाच सर्व सदस्यांना सोबत घेऊन अडीच-अडीच वर्षाचा कालावधी करण्याचे ठरवण्यात सुद्धा आलेले होते.

गेल्या एक महिन्यापूर्वीच सरपंच ईश्वरदास गेडाम यांचे निधन झाले त्यामुळे उपसरपंच दादाजी किनेकर यांच्याकडे प्रभारी सरपंच पदाची धुरा आली मात्र शिरशी व साखरी गावाचा विकास कार्यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांच्या पाहिजे त्या पद्धतीत सहकार्य मिळत नसल्याचे प्रभारी सरपंच दादाजी किनेकर यांच्या लक्षात आले. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाच्या कालावधी हा ऑगस्ट महिन्यात संपत असताना सुद्धा आज दिनांक ९ जून ला दादाजी किनेकार यांनी आपल्या प्रभारी सरपंच, उपसरपंच पदाचा राजीनामा संवर्ग विकास अधिकारी सावली यांच्याकडे सोपवलेला आहे. त्यामुळे त्या परिसरातील राजकारणात एकच खळबळ माजलेली आहे.

अखेर राजीनामा मंजूर

साखरी ग्रामपंचायत चे उपसरपंच तथा प्रभारी सरपंच दादाजी किनेकर यांनी संवर्ग विकास अधिकारी सावली यांच्या दिलेल्या राजीनामा मंजूर करून सदर पत्र ग्राम पंचायत साखरी कार्यालयाला पाठविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये