Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री महर्षी विद्या मंदिर शाळेची शिक्षिका श्रीमती. सुदिप्ता आस्टुनकर यांना मिळाला ‘हिंदी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार’

चांदा ब्लास्ट

१४ सप्टेंबर २०२४ हिंदी दिवसाच्या शुभ दिनी श्री महर्षी विद्या मंदिर, दाताला येथील हिंदी शिक्षिका श्रीमती. सुदिप्ता आस्टुनकर यांना दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावर सम्मानित केले गेले. १४ सप्टेंबर, हिंदी दिवसाचे औचित्य साधून देशभरातील निवड केलेल्या १८० लोकांचा हिंदी शिक्षण, रचनात्मक लेखन आणि हिंदी भाषेसाठी विशेष योगदान देणारे शिक्षक यांचा “हिंदी है हम” या शीर्षकाखाली ‘चेम्बर्स ऑफ कॉमर्स ‘ या सभागृहात सन्मान सोहळा मधुबन परिवारातर्फे आयोजित केला गेला. ज्यामध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री महर्षी विद्या मंदिर, चंद्रपूर ची हिंदी शिक्षिका सुदिप्ता आस्टुनकर यांना सन्मानित केले गेले . सुविज्ञ असलेल्या शिक्षिका सुदिप्ता आस्टुनकर या ३१ वर्षांपासून हिंदी शिक्षण क्षेत्रात निरंतर आपली सेवा देत आहे.

गुरुकुल शिक्षा संस्थांचे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक, उपाध्यक्ष श्रीमती. वसुधा कंचर्लावार, सचिव श्री. दत्तात्रय कंचर्लावार, कोषाध्यक्ष श्री. अनुपम चिलके तसेच सदस्य श्री. उमेश चांडक, श्री. वीरेंद्र जयस्वाल, श्रीमती. अलका चांडक तसेच विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती. श्रीलक्ष्मी मूर्ती, उपप्राचार्या श्रीमती. निशा मेहता या सर्वांनी शिक्षिकेचे खूप खूप अभिनंदन केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कशी हिंदू विश्वविद्यालयाचे हिंदी विभागाध्यक्ष व गाजलेले गजल लेखक प्रो. वशिष्ठ अनुप व विशेष पाहुणे बाल साहित्यकार मधु पंत, शिक्षा सल्लाहगार डॉ . प्रदीप जैन, हिंदी केंद्रीय शिक्षण संस्था NCERT प्रो. नीरा नारंग, प्रवक्ते दिल्ली प्रशासन आकाशवाणी सादरकर्त्या श्रीमती. विनीता काम्बिरी तसेच उच्चविद्याविभूषित महेश प्रसाद व श्रीमती. चेतना कावटा, विषयतज्ञ उद्यम स्कूल फॉर चिल्ड्रेन अहमदाबाद या सर्वांनी त्यांचे अनमोल विचार सर्वांसमोर मांडले.

शिक्षिका सुदिप्ता आस्टुनकर यांनी त्यांचे यश व त्यांना मिळालेला सन्मान याचे श्रेय शाळेला तसेच मुख्याध्यापिका श्रीमती. श्रीलक्ष्मी मूर्ती तसेच उपमुख्याध्यापिका निशा मेहता यांना दिले. ज्यांच्या सहकार्यांनी व प्रोत्सहनांनी हे शक्य होऊ शकले, असे त्या म्हणाल्या. शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षिकांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. श्रीमती. सुदिप्ता आस्टुनकर यांनी सर्वांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये