Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय खुली कराटे स्पर्धेचे थाटात उद्घाटन!

कराटे हा आत्मरक्षण व शरीर - मनाचा समतोल साधणारा मार्ग- पोलिस उपनिरीक्षक डोणेकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- कराटे हा खेळ खेळाडूंमध्ये शिस्त, खिलाडू वृत्ती निर्माण करते. कराटे आत्मरक्षणाबरोबर शरीर व मनाचा समतोल साधणारा मार्ग आहे असे मत स्पर्धेचे उद्घाटक
देवळीचे ठाणेदार विशाल डोणेकर यांनी राष्ट्रीय खुली कराटे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश बकाने,लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा चे संचालक अनिल नरेडी,स्पर्धेचे स्वागताध्यक्ष संदीप चिचाटे, अध्यक्ष आशिष पोहाने, धनंजय ढोमणे सौरभ ढोंमणे,संचालक एम. टी. डी.ज्वेलर्स, अमोल ढोंमणे, मानकचंद सुराणा,विनोद घीया, आयोजक सेन्साईअनूप कपूर व सेन्साई धनंजय कपूर , सुरेंद्र जावंधीया, अनंत देशमुख, राजू धोंगडे, विनय बोधे,संजय कोल्हे,विपीन हाडके,उल्हास वाघ,सचिन मून,अविनाश भोंडे,महेश गावंडे,दिलीप कठाने,सचिन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्व. सुरेश व सुभाष ढोमणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ब्लॅक कमांडो मार्शल आर्ट असोसिएशन इंडिया, जय महाकाली शिक्षण संस्था, वर्धा, आणि लायन्स क्लब गांधी सिटी, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी राष्ट्रीय आमंत्रित खुली कराटे स्पर्धेचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले.
देशभरातील विविध राज्यांतून तब्बल नवशे कराटेपटू या स्पर्धेत सहभागी झाले. या प्रसंगी स्वागताध्यक्ष संदीप चिचाटे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता सेन्साई अनूप कपूर व त्यांच्या संघटनेला शुभेच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे संचालन मोहन सायंकार यांनी केले तर प्रास्ताविक सेन्साई धनंजय कपूर यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पुरस्कार वितरण प्रमुख शुभम हांडा, स्वागत कक्ष प्रमुख जयंत संबोजी, संघ प्रवेश प्रमुख गिरधर शाहू, स्टेज व्यवस्थापक लोकेश अग्रवाल, स्पर्धा ठाक व्यवस्थापक शशांक हांडा, निवास व्यवस्था प्रमुख ओम हांडा, आणि भोजन व्यवस्था प्रमुख कुणाल रामगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये