आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायखेडा शाळेची विद्यार्थिनी हिमानीची नवोदय विद्यालय बाळापुर येथे निवड

सायखेडा शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. शेखर प्यारमवार

जि.प.उच्च प्राथमिक शाळा सायखेडा येथील विद्यार्थिनी कुमारी हिमानी कुमोद ब्राह्मणवाडे हिने नुकतीच नवोदय परीक्षा उत्तीर्ण केली असून नवोदय विद्यालय बाळापुर येथे वर्ग ६ वीमध्ये प्रवेश मिळाला आहे. हिमानीने नवोदयची परीक्षा उत्तीर्ण केल्याने सायखेडा शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सर्व शिक्षकवृंद व पालक आणि समस्त गावकरी मंडळीनी तिच्या सत्कार केला आहे या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक गेडेकर सर,मार्गदर्शक शिक्षक नितीन कुनघाडकर, राऊत, येनगंटीवार, शेडमाके, इंदोरकर, शाळा व्यवस्थापन समिती व आई विद्या आणि वडिल कूमोद ब्राह्मणवाडे यांचा मोलाचा वाटा आहे.या यशाबद्दल गटशिक्षणअधिकारी माननीय खंडारे साहेब, विस्तार अधिकारी संध्याताई कोनबत्तुलवार, केंद्रप्रमुख बोरेवार सर,राऊत सर, पंचायत समितीतील सर्व शिक्षकवृंदांनी व गावकरी मंडळी सायखेडा यांनी हिमानीचे भरभरून केले कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये