डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे यांची उपस्थिती होती.
मंचावर प्रा श्रीमती आरजू आगलावे, माधुरी मस्की आणि प्रा नंदा भोयर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, लाड सर, प्रा माधुरी पेटकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची महत्ता विशद करत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडले.
यावेळी भीम गीत सादर करून देवराव जाधव यांनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वामन टेकाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज तोडासे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.