Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय,महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडमी व महात्मा गांधी विद्यामंदिर, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून,प्राचार्य डॉ शैलेंद्र देव, मुख्याध्यापिका कुंडु,पर्यवेक्षक श्री शंकरराव तुराणकर व विना देशमुख उपस्थित होत्या.या ध्वजारोहण कार्यक्रमाबरोबरच प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम सरदार पटेल व प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,या कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री वामन टेकाम यांनी केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये