विश्वशांती विद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हा स्तरावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र् राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर,तालुका क्रीडा कार्यालय सावली यांच्या संयुक्त विद्यमाने पेंढरी मक्ता येथे शालेय क्रीडा स्पर्धचे आयोजन करण्यात आले.संत गजानन महाराज विद्यालयाच्या मैदानात झालेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत विश्वशांती विद्यालय सावलीचा संघ विजयी झाला.विश्वशांती विद्यालयाने पालेबारसा संघाचा पराभव करीत विजय संपादन केला व तालुक्यात प्रथम स्थान पटकाविले.
चंद्रपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धेत सावली तालुक्याचे प्रतिनीधीत्व करणार आहे.विजयी संघाचे,संस्थेचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार,सचिव राजाबाळ पाटील संगिडवार,शाळा समितीचे अध्यक्ष अनिलभाऊ स्वामी मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम व सर्व समितीचे पदाधिकारी व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे.