ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एचएससी परीक्षेत सुयश

चांदा ब्लास्ट

      महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. १२ वी परीक्षेचा निकाल सोमवार दि ५ मे. रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विज्ञान शाखेचा निकाल ९८.५५% लागला तर कला शाखेचा निकाल ९३% लागला.

          यात अनुक्रमे विज्ञान विभागात कु. सोनू यादव(८५.५०%), कु. हर्षाली धकाते(८४.१७%), कु. पूजा सोरते(८०.33%) तसेच कला विभागात

१)कु.रूपाली सुरेश पुच्छलवार (८५.८३%)

२)कु.सेजल विलास बोबडे (८४.१७%)

३)कु.दीपाली संतोष अलोणे (७५.३३%)

        या विद्यार्थिनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य डॉ.श्री राम भारत यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

          या यशाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. रवींद्रजी भागवत, सचिव श्री. गांगेय सराफ, कार्यकारिणी सदस्य डॉ. राम भारत, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. राजपुरोहित सर, पर्यवेक्षक श्री. जहागीरदार सर, पर्यवेक्षिका सौ.देगामवार मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये