Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा अध्यक्षपदी अरुण खराते यांची दुसऱ्यांदा निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

म.रा.कॉष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे या संघटनेची जिल्हा सभा नुकतीच पर पडली यावेळी केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य कांबळे यांचे अध्यक्षतेखाली व संघटनेचे जिल्हा नेतेकिशोर नागदेवते, धम्मपाल गावंडे, मा.रत्नमाला गेडाम आणि राज्य उपमाहासचिव सूर्यभान हुमणे यांचे उपस्थितीत जिल्हा कार्यकारणी निवडीबाबत संपन्न झाली.

कॉष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ ही संघटना राज्यातील बहुजन समाजाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणारी एकमेव संघटना असल्याने सदर सभेत जिल्हाभरातील तमाम कर्मचारी उपस्थित होते. संघटना हि सामाजिक चळवळीशी बांधील असून समाजातील गोरगरीब मुलांच्या विविध प्रश्नाबाबत,आरक्षणासह बहुजन समाजातील विद्यार्थी व कर्मचारी यांच्या समस्यांसाठी लढा देऊन अनेक समस्या मार्गी लावल्या असे विचार केंद्रीय अध्यक्ष म. ना. कांबळे यांनी व्यक्त केले.

सभेचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे सभा लोकशाही पद्धतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांतमय वातावरणात सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व सर्वसामान्य सभासदांच्या उपस्थितीत पार पडली, सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.

सदर सभेत खालीलप्रमाणे जिल्हा कार्यकारणी गठीत

१)अरुण खराते -जिल्हा अध्यक्ष, २)जगदीप दुधे – महासचिव, ३)अजित साव –कार्याध्यक्ष, ४)शंकर मसराम –कोषाध्यक्ष, ५)रत्नमाला गेडाम-मुख्य संघटक, ६)सुरेश राऊत -अतिरिक्त महासचिव, ७)जिल्हा उपाध्यक्ष -महेंद्र लोखंडे, सुधाकर कुळसंगे, प्रशांत बांबोळे, महेंद्र खोब्रागडे, सुरेंद्र भैसारे, अशोक गावंडे, ८)गोविंदा सोनटक्के -जिल्हा सहसचिव, ९)डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे – मुख्य सल्लागार १०)सचिन रामटेके -जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, ११)संजीवनी खोब्रागडे -जि. प. मुख्यालय शाखा अध्यक्षा, १२)प्यारेलाल गेडाम -जिल्हा शिक्षक सेल अध्यक्ष, १३)बंडू खोब्रागडे -जिल्हा शिक्षक सेल सचिव, १४)दामोधर रामटेके -शिक्षक सेल उपाध्यक्ष, १५)नयनपाल दुधे -ग्रामसेवक सेल अध्यक्ष, १६)जिल्हा महिला प्रतिनिधी संगीता मानकर, चंदा गवळी, अल्कादेवी दुधे १७) सोनिया थेरकर -आरोग्य सेल अध्यक्ष कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कोषाध्यक्ष शंकर मसराम तर आभारप्रदर्शन कार्याध्यक्ष अजित साव यांनी केले. सभेला जिल्हाभरातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये