Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श हिंदी विद्यामंदिर येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर तथा विद्यालय येथे हिंदी दिवस १४ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयात नाट्य स्पर्धा नृत्य स्पर्धा कविता गायन भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री देवप्रकाश पोद्दार यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. मंजुषा मते होत्या. कार्यक्रमाचे विशेष अतिथी गडचांदूर येथील नाट्य कलावंत अतुल गोरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून अनिल भारती उपस्थित होते.

 नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक बिना टिकट या नाटकाला मिळाला तर द्वितीय क्रमांक बेटी बचाव बेटी पढाव, तृतीय क्रमांक प्रगती या नाटकाला मिळाला प्रोत्साहन पर पुरस्कार कला का सन्मान या नाटकास प्राप्त झाला. स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत कुमारी आरती आगे हिला प्रथम क्रमांक संजना केवट द्वितीय क्रमांक रागिनी निषाद ला तृतीय क्रमांक मिळाला. समूह नृत्य स्पर्धेत कक्षा आठवी व नववीच्या ग्रुपला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक कक्षा सहावीच्या ग्रुपला तृतीय क्रमांक कक्षा तिसरीच्या ग्रुपला मिळाला. स्पर्धेचे परीक्षण अतुल गोरे व पुरुषोत्तम निब्रड,दुर्गावती राय, निधी सिंग यांनी केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक देवप्रकाश पोद्दार यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषा जागतिक स्वरूप प्राप्त करत असून भारताच्या विकासात हिंदी भाषेचे महत्व आहे असे सांगितले. श्री अतुल गोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की गडचांदूरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात आदर्श हिंदी विद्यामंदिर चे विद्यार्थी एक दिवस नक्की दिल्लीमध्ये पोहोचवतील. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मंजुषा मते यांनी सर्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आणि आपल्या मध्ये असलेल्या कलागुणांना विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे मी नेहमी तुमच्या पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम बोरकर यांनी केले संचालन संचालन राकेश गोरे तर आभार अरविंद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. विद्यार्थी मंत्रिमंडळांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये