Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोपीच्या ताब्यातून अंमली पदार्थ जप्त

एकूण 87 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन पो. स्टे. सांवगी मेघे हद्दीत NDPS ACT 1985 अन्वये रेड करून आरोपीतांचे ताब्यातुन MD (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ, 01 मोबाईल व मोपेड वाहन असा एकूण जु. किं. 87,820/- रु. चा मुद्देमाल जप्त केला

 दिनांक 05/09/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथके पोलीस स्टेशन सांवगी मेघे परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करने करिता पेट्रोलिंग करित असतांना मुखबिरद्वारे गोपनीय माहिती मिळाली की, वर्धा वरून सांवगी मेघे कडे मोपेड वाहन क्र. एम.एच. 32 ए.एल. 5896 या वाहनाने MD (मॅफेड्रॉन ) अंमली पदार्थ ची वाहतूक करून येत आहे. अशा माहिती वरून पो. स्टे. सांवगी मेघे हद्दीत नेस कॅफे जवळ नाकाबंदी करून आरोपी नामे – 1) भावेश अभीजीत इंगोले वय 21 वर्ष, रा. गणेश नगर, वर्धा यास होंडा डीओ मोपेड क्रमांक एम.एच. 32 ए.एल. 5896 सह ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 1) 9 ग्रॅम 48 मिलिग्रँम वजनाची MD (मॅफेड्रॉन) किंमत 37,820/-₹. 2) 01 अँड्रॉइड मोबाईल किंमत 10,000/-रू,3) एक होंडा डीओ मोपेड जिचा क्रमांक एम.एच. 32 एम.एल. 5896 किंमत 40,000/-असा एकूण जु. किंमत 87,820/-रुपये चा मुद्देमाल* मिळून आल्याने शासकीय पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. आरोपीतांना MD ( *मॅफेड्रॉन* ) कुठून आणली याबाबत विचारणा केली असता त्याने आरोपी क्रमांक 2) आसीफ अख्तर शेख (पसार) रा.इतवारा बाजार, वर्धा यांचेकडून खरेदी करून आणल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपीतां विरुद्ध पोलीस स्टेशन सांवगी मेघे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सूरु आहे.

सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात श्री. विनोद चौधरी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो. उप. निरिक्षक, सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार मनोज धात्रक,हमीद शेख, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, नरेंद्र पाराशर, अरविंद यनुरकर,शेखर डोंगरे,आशिश महेशगौरी, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, मुकेश ढोक, उदय सोलंकी, अभिशेख नाईक,दिनेश बोथकर,अंकीत जिभे,शिवकुमार परदेशी, गजानन दरणे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये