Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात “जेंडर सेंसीटीव्हीटी इशू” यावर व्याख्यानाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व इंटरनल कंप्लेंट कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय “जेंडर सेन्सिटिव्हिटी इशू” या विषयावर भद्रावती येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रिया शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल. एस. लडके, प्रमुख अतिथी व व्याख्याते डॉ. प्रिया शिंदे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, भद्रावती, श्री विशाल गौरकार व विद्यार्थी विकास विभाग व इंटरनल कंप्लेंट कमिटी कॉर्डिनेटर प्रा.सौ. डॉ अपर्णा धोटे उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्याअर्पन व पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली.

याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. अपर्णा धोटे यांनी केले त्यात त्यांनी “जेंडर सेन्सिटिव्हिटी इशू” या कार्यक्रमा मागचा हेतू स्पष्ट केला.

तसेच भद्रावती येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व प्रमुख व्याख्याते डॉ. प्रिया शिंदे यांनी आज देशात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी चिंता व्यक्त करीत आज स्त्रियांनी सतर्क राहण्याचे, जागृत राहण्याचे व बदनामी ला न घाबरण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी आपल्या व्याख्यानातून संस्कृती, व्यसन, संस्कार यावर प्रकाश टाकला. तसेच स्त्रियांनी आपले विचार व्यक्त करावे व झालेल्या अन्यायाची वाचता करावी व स्त्रियांविषयीच्या स्त्रियांवरील अन्याय विरोधात आपल्या कायद्यात असलेल्या सर्व कलमांची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “जेंडर सेन्सिटिव्हिटी इशू” याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले त्यात त्यांनी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात कार्यरत असलेल्या महिलां विषयीची सर्व समित्यांची माहिती देत महाविद्यालयातील विद्यार्थिनींना या महाविद्यालयात सुरक्षेची हमी दिली.

या कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विभाग प्रमुख व इंटरनल कंप्लेंट कमिटी कॉर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे तर आभार प्रदर्शन लेफ्टनंट प्राध्यापक सचिन श्रीरामे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनामिका चौधरी, हिमांगी शेट्टी, प्राची वाबीटकर, रागिनी निखाडे, तृप्ती बगडे, यामीनी मारापल्ली, प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे, प्रा. डॉ. अजय दहेगावकर, प्राध्यापक डॉक्टर नथू वाढवे, प्रा. डॉ. राजेश हजारे, प्रा.डॉ. शशिकांत सीत्रे, प्रा. डॉ. प्रवीण कुमार नासरे, प्रा. डॉ.कुंदन शहारे, प्राध्यापक संदीप प्रधान, प्राध्यापक लेफ्टनंट सचिन श्रीरामे, प्राध्यापक कुलदीप भोंगळे, प्राध्यापक डाॅ किरण जुमडे, श्री किशोर भोयर, श्री अजय आसुटकर, सौ सुकेशनि भवसागर, श्री शरद भावरकर, श्री प्रमोद तेलंग यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये