Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          स्थानिक भद्रावती येथील प्रशासकीय सेवा महाविद्यालयामध्ये 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थांनी आजच्या या दिवशी शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त केले. महान शैक्षणिक तत्ववेत्ता, आणि एक प्रख्यात मुत्सद्दी, विद्वान, भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती आणि शिक्षक म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ओळख आहे. या निमित्तानेच डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवेचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थांनी पुढाकार घेऊन आदर्श शिक्षकांची भूमिका एकदिवसीय शिक्षक बनून पार पाडली. यावेळी स्वाती गायकवाड, सिद्धार्थ गेडाम, महेश उताणे, मोहिनी बोदने यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून महाविद्यालयातील विविध विषयांची भूमिका मांडली. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आमच्या विभागात शिक्षक दिन कार्यक्रम आयोजित केला. हे संपूर्ण कार्य महाविद्यालयाचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे आणि सर्व शिक्षकांनी आखले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रथम वर्षाची विद्यार्थिनी खुशी नन्हे हिने केले. प्रास्ताविक प्रा. प्रीती कांदिकुट्टीवार यांनी केले आणि त्यानंतर अभिनव उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना, शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही भाषणाद्वारे डॉ. राधाकृष्णन यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकून मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. प्रज्ञा लांडे यांनी संगीताच्या माध्यमातून शिक्षक दिनाचा सार व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणातून डॉ. प्रशांत पाठक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य प्रमोद पाठक यांनी पुष्पगुछ देऊन कौतुक केले. कार्यक्रमाचा शेवट कु. सृष्टी बशाशंकर हिने करून सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी प्रा. नेहा मानकर, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. कपिल राऊत तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. अशा प्रकारे डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये