Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या क्रिकेट संघाचे घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे व्यंकटेश महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 17 वर्षे वयोगटात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तसेच 14 वषींय वयोगटातील देखील या स्पर्धेत त्यांनी प्रथम स्थान पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी माध्यमिक विद्यालय, देऊळगाव राजा यांच्या संघांमध्ये चुरशीची लढत झाली. स्वामी विद्यालयाने प्रथम फलंदाजी करत पाच षटकांत 41 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

प्रत्युत्तरात, राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने 4.3 षटकांत चार गडी गमावून हे आव्हान सहज पार केले.या सामन्यात मुदतशीर यांनी चार चेंडूत 11 धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर रोहन खरात यांनी 16 धावा आणि आदित्य राजचंद यांनी 15 धावा करत विजयाच्या दिशेने संघाचे नेतृत्व केले.14 वषींय वयोगटातील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध सहकार विद्या मंदीर यांच्या अंतिम सामन्यात राजलक्ष्मी  इंटरनॅशनल स्कूल ने विजय मिळवत आपले स्थान पक्के केले त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीनलताई रामप्रसाद शेळके आणि सचिव डॉ. रामप्रसाद शेळके यांनी संघाच्या यशाचे विशेष कौतुक केले व आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सीईओ सुजित गुप्ता, प्राचार्य प्रियंका देशमुख, हलचल उस्मानी आणि प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब गोजरे, वसीम सर, राजीव खांडेभराड यांनी देखील संघाला प्रोत्साहित केले. संघाच्या या विजयात विशेष मार्गदर्शन राजेश पंडित आणि पंढरीनाथ भुतेकर यांचे मोलाचे योगदान लाभले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गानेही संघाचे अभिनंदन केले. राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचा हा विजय भविष्यातील कामगिरीसाठी प्रेरणादायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये