Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या परिसरातील एकमेव सीबीएससी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन विशेष उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या लहान मुलांनी रंगारंग रॅम्प वॉक सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. मीनलताई शेळके आणि डॉ. रामप्रसाद शेळके यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संस्थेचे सचिव डॉ. रामप्रसाद शेळके यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षक दिनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की, “जसे आई आपल्या मुलांवर संस्कार करते, तसेच शिक्षक त्यांना घडवण्याचे, सक्षम करण्याचे काम करतात. जीवनाला दिशा देण्यामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा असतो.”

शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील शिक्षक दिनाच्या निमित्ताने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर भाषणे दिली. या कार्यक्रमात शाळेचे सीईओ सुजित गुप्ता, प्रिन्सिपल प्रियांका देशमुख, फैजल उस्मानी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शुभांगी सवडे हिने केले, तर आभार प्रदर्शन अंजली बकाल हिने केले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आनंद आणि उत्साहाची लहर पाहायला मिळाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये