Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शक्ती कायदा महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू करावा – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रतिपादन 

खासदार अमर काळे यांचा नागरी सत्कार ; संयोजक डॉ.अभ्युदय मेघे तसेच व्यापारी असोसिएशनचे व सामाजिक संघटनेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

बदलापूर दुर्घटना अत्यंत दुर्दैव आहे.अश्या घटना महाराष्ट्रात घडू नये,यासाठी मी गृहमंत्री असताना शक्ती कायदा आणला आणि त्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला होता.पण तो केंद्रात अद्याप पारित झाला नाही त्यासाठी मी सतत पाठपुरवा करत आहे .

असे प्रतिपादन माजी गृहमंत्री यांनी वर्धा येथे आयोजित खासदार अमर काळे यांच्या नागरी सत्कार समारंभात बोलत असताना केले पुढे ते म्हणाले,या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याचा नाही.ते मुळे ते वारंवार पुढे ढकलत आहे असेहि ते म्हणाले.

आज खासदार अमर काळे नागरी सत्कार समितीच्या वतीने वर्धा जिल्हा व्यापारी संघटना व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने नवनियुक्त खासदार अमर काळे यांचा नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर माजी आमदार सुरेश देशमुख, डॉ.विभा गुप्ता, सुरेशबाबू जयस्वाल, परमानंद तापडिया जी शालिग्राम तिबडेवाल, श्रीकांत राठी,संयोजक डॉ .अभ्युदय मेघे मंचावर उपस्थित होते.

खासदार अमर काळे यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना सांगितले की,मी लवकरात लवकर वर्धा शहरात जनसंपर्क कार्यालय सुरू करत आहे.या माध्यमातुन नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.ते पुढे म्हणाले की लवकर वर्धा शहरातील व्यापारी संघटनाशी बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन. जीएसटी सारखा विषय लोकसभा मांडणार असल्याची वचन देखील त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमांचे प्रास्ताविक डॉ अभ्युदय मेघे यांनी केले ते त्यांनी व्यापार्याना येणाऱ्या समस्या मान्यवरान समोर व्यक्त केल्या.पुढे त्यांनी व्यापाराचे आभार देखील मानले.

अध्यक्षस्थानी सुरेश देशमुख यांनी नवनिर्वाचित खासदारांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमांचे संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार नौशाद बैक्ष यांनी केले.कार्यक्रमाच्या यशवितेसाठी वर्धा सोशल फोरम,

सिंधी समाज असो, सेवा समिती असो, भारतीय माजी सैनिक संघटना, गांधी जिल्हा फोटोग्राफर असो, लायन्स क्लब गांधी सिटी,विदर्भ कॉलेजटीचर असो, जवान डिफेन्स अँड स्पोर्टस् करिअर अकॅडमी, कुणबी ऍड संघटना, वर्धा मंडप साउंड सिस्टम,जय हिंद फाऊंडेशन, वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षण संघटना, क्रेडिया बिल्डर असो, लॉइन्स क्लब वर्धा, जनहित मंच, गुड मॉर्निंग ग्रूप, आधारवड ज्येष्ठ नागरीक, निसर्ग सेवा समिती, महेश्वरी मंडल वर्धा, स्पोर्ट्स कराटे असोसिएशन,बॅचलर रोड मार्केट असो, वीर बजरंगी ग्रूप बागेश्र्वर धाम सेवा समिती, वर्धा व्यापारी संघ, माळी समाज संघटना, साप्ताहिक वर्धा की आवाज, टाईल्स अँड स्टील असो, हार्डवेअर असो, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, कोचिंग क्लासेस असोसिएशन, श्री संत भिकाजी महाराज फाऊंडेशन वर्धा, सिमरन बहुउद्देशिय संस्था यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये