ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तान्हा पोळा, गणपती, दुर्गाउत्सव समिती तथा भाजपा तर्फे नंदी बैल सजावट स्पर्धा 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : तान्हा पोळा, गणपती, दुर्गाउत्सव आयोजन समिती व भाजपा तर्फे मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत गांधी चौकात नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडणूक प्रमुख ७० राजुरा विधानसभा तथा माजी जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर देवराव भोंगळे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महामंत्री भाजपा जिल्हा चंद्रपूर विवेक बोढे, विशेष अतिथी माजी सभापती जि.प.चंद्रपूर नितु चौधरी, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी उपसभापती पं. स. चंद्रपूर निरीक्षण तांड्रा, माजी जि.प.सदस्य चिन्नाजी नलभोगा, माजी सरपंच संतोष नुने, जिल्हा सचिव विनोद चौधरी, माजी सदस्य साजन गोहने, प्रकाश बोबडे, श्रीनिवास इसारप, राजकुमार गोडसेलवार, कुसुम सातपुते, पुजा दुर्गम, वैशाली ढवस, सुचिता लुटे, सुषमा सावे, नंदा कांबळे, जेष्ठ समाजसेवक प्रेमलाल पारधी, माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला, हसन शेख, जय श्रीराम गणेश मंडळ अध्यक्ष सुनील बाम,उत्तर भारतीय आघाडी उपाध्यक्ष रत्नेश सिंग, जेष्ठ नेते पुनम शंकर, संजय भोंगळे, भाजपा उपाध्यक्ष हेमराज बोंबले परीक्षक संजय उपाध्ये, प्रशिक्षक विनय बोढे उपस्थित राहणार आहे.

सामाजिक संदेश देणारी सजावट करणे अनिवार्य आहे.

प्रथम पारितोषिक २,००१ रुपये, द्वितीय पारितोषिक १,५०१ रुपये, तृतीय पारितोषिक १,००१ रुपये, प्रोत्साहन पर पारितोषिक २०० रुपये देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे संयोजक गणेश कुटेमाटे, पियुष भोंगळे, गौरव ठाकरे, गजानन जोगी, शुभम जेऊरकर, राहुल ठाकरे, परिमल नांदे, मंगेश राजूरकर, उमेश दडमल, प्रणय बोकडे, गणेश दडमल, प्रणय मुक्के, गणेश राजूरकर यांनी नागरिकांनी मोठया संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये