ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त व गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न 

चांदा ब्लास्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त संपूर्ण भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली जात आहे. व गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी च्याअनुषंगाने आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सांगळे हॉस्पिटल देऊळगाव राजा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतुल भाऊ भुसारी पाटील विदर्भ अध्यक्ष शेतकरी आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष, जिल्हा अध्यक्ष कारभारी गायकवाड, राष्ट्रीय समाज पक्ष संतोष भाऊ वनवे विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष माजी जिल्हा अध्यक्ष सुनील काळे पत्रकार मुन्ना ठाकुर, डॉक्टर स्वाती ताई सागळे व डॉ ज्ञानेश्वर सांगळे,ऋषिकेश दवाखाने व त्यांचे सहकारी आदि मान्यवर उपस्थित होते. दिवसभरात 130 पेशंटची तपासणी करण्यात आली.

शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये