ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रूग्णालयात पद निर्मिती करून ते तातडीने सुरू करा

आ. सुभाष धोटेंची आरोग्यमंत्राकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- राजुरा विधानसभा मतदार संघातील जिवती तालुका हा डोंगराळ व आदिवासी बहुल असुन जिल्ह्याचे ठिकाणापासुन १०० किमी अंतरावर आहे. तालुक्यातील सर्व सामान्य नागरीकांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिवती येथे ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालयास दिनांक १७ जानेवारी २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.

त्यानुसार जिवती तालुक्याचे ठिकाणी ग्रामीण रूग्णालय इमारतीचे १०० टक्के बांधकाम पुर्ण झाले असून रूग्णालय सुरू करणेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करूण देण्याकरिता पद निर्मिती करणेबाबतचा प्रस्ताव सहसंचालक, आरोग्य सेवा, रूग्णालये राज्य स्तर मुंबई यांचे कार्यालयाकडुन पदनिमिर्ती बाबतचा प्रस्ताव प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग (आरोग्य 3) मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयाकडे दिनांक २ मे २०२३ रोजी प्रस्ताव फेर सादर करण्यात आलेला आहे.

करीता ग्रामीण रूग्णालय जिवती येथे आकृतीबंधानुसार पद निर्मितीस मंजुरी देऊन ते तातडीने सुरू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये