Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी ध्येय : उपसरपंच मंगेश मगाम

चांदा ब्लास्ट

शिक्षकांचे वक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे असे मत कोंढा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मगाम यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती तालुक्यातील कोंढा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मगाम यांचे उपस्थित मंगळवार दिनांक २७/०८/२०२४ रोजी कोंढा, चालबर्डी, मांजरी, पळसगाव, कढोली, किलोनी, बेलोरा, टाकळी, जेना, नंदोरी (बु.), नंदोरी (खु.), भटाळी, धानोली, डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळा व उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना पुढे म्हणाले कि आजचे युग हे संगणकाचे युग आहे. कुठल्याही नव्या परिवर्तनाच्या आणि संक्रमणामागच्या शक्तीचा उगम प्रभावी शिक्षण हे माहिती व तंत्राधिष्ठीत आहे. आपल्या शाळांमधून परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा खरे ज्ञानाकांक्षी, विवेकनिष्ठ प्रयोगवीर तयार होण्यासाठी प्रत्येक शाळा ही साक्षात प्रयोगशाळा झाली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या वाट्याला आलेले काम कुशलतेने, आनंदीवृत्तीने, बिनचुकपणे, वेळेत आणि नियमांच्या आधीन राहून करायला हवे. बुद्धीवादी शक्ती या भूमिकेतून प्रत्येक शिक्षकाने नवनवीन अध्यापन तंत्राचा अवलंब करून विषयात सहजता आणावी. त्या त्या विषयाचा प्रत्यक्ष जीवनाशी असणारा संबंध स्पष्ट करावा आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण बनावे.

भद्रावती तालुक्यातील कोंढा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक मुकुंद देशमुख, शिक्षिका भाग्यश्री कामडी, नाजिया कुरेशी, शिक्षक हर्षलकुमार उराडे, आशिष चुनारकर, तर चालबर्डी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक विलास भोयर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास भोयर, शिक्षक रुशता मत्ते, मांजरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापिका बालमित्रा कुलसंगे, शिक्षिका स्मिता ठाकरे, पळसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधाप कशंकर इंगोले, कढोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापिका माया निखाडे, उपसरपंच्या सौ. माधुरी सचिन डुकरे मॅडम, शिक्षक विजय पाटील, किलोनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापिका उज्वला ठेंगणे, सविता विलास टिपले, बेलोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापक रमेश ठेंगणे, शिक्षक वासूदेव पावसे, टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापिका संध्या कुबडे, शाळा समिती सदस्य विठ्ठल दातारकर, शिक्षिका जयश्री बंड, जेना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापिका मेघा थाईत, शिक्षक सचिन जांभुळे, नंदोरी (बु.) जिल्हा उच्च परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापक मनोहर राजगिरे, शिक्षक विजय सातपुते, विजय भोमले, शिक्षिका माधुरी चौधरी, नंदोरी (खु.) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापिका अर्चना कुलकर्णी, शिक्षिका कु. हेमलता वाघाडे, भटाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापक मोतीलाल झाडे, शिक्षिका नागोसे, धानोली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक कोडापे, शिक्षक खाडे पाटील, मसराम सर, डोंगरगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक विनोद गौरकार, शिक्षक प्रवीण गोरख, प्रवीण बेलखुंडे आदींची यांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये