Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठी विषय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्षपदी प्रा डॉ. ज्ञानेश हटवार यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या शासनमान्य नोंदणीकृत संघटनेची नवीन कार्यकारणी ची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. नुकतीच महाराष्ट्रातील मराठी विषय शिक्षक महासंघाची आभासी पध्दतीने सभा घेण्यात आली. त्यात भद्रावतीचे “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांची या संघटनेच्या राज्याचे उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष प्रा सुनील डिसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आभासी बैठकीत सचिव प्रा बाळासाहेब माने यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ सन २०१० पासून ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे. पण २०१९ ला मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर मराठी विषय अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची ही सर्वात मोठी संघटना आहे.

यात मराठी भाषा विषयातील शिक्षकांच्या समस्या, अध्ययन अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी या संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जाऊन, मराठी भाषा विषय हा महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत सक्तीचा व्हावा. मराठीला कुठल्याही विषयाचा पर्याय असता कामा नये, ही महासंघाची भूमिका आहे. यासाठी शासन स्तरावर, प्रशासकीय स्तरावर संघटनेच्या माध्यमातून अनेक पत्र व्यवहार झाले.

संघटनेच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी राज्य कार्यकारणीची निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात येते. सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन राज्य कार्यकारणी बाळासाहेब माने यांनी घोषित केली. यात,”महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मानित प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे प्राध्यापक म्हणून मागील २४ वर्षापासून कार्यरत आहेत. मागील पाच वर्षाच्या कार्यकारणीत ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. या कालावधीत त्यांनी मराठी विषय शिक्षकांना संघटित करून विषय शिक्षकांच्या समस्या, अध्ययन अध्यापनातील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मागील वर्षी त्यांनी मराठी विषय शिक्षक महासंघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आनंदवन, वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे यशस्वीरित्या संपन्न केले.

ही राज्यकारिकांनी सर्व समावेशक असून “महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी विषय हा सक्तीचा व्हावा, व मराठी विषयातील शिक्षकांचा कार्यभार कायम राहील तसेच मराठी विषय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जातील यासाठी ही राज्य कार्यकारणी कटिबद्ध आहे. महाराष्ट्रात मराठी विषयाला जी सापत्न वागणूक दिली जाते, हे मराठी विषय शिक्षक महासंघ कदापीही खपवून घेणार नाही ” असे मत संघटनेचे नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार यांनी व्यक्त केले.

प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांना २०२३ चा “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक भारती संघटनेचे ते नागपूर विभाग प्रसिद्ध प्रमुख आहेत. ते पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती चे अध्यक्ष आहेत. विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती चे सचिव म्हणून कार्यरत आहेत. ग्रंथालय संघाचे ते सदस्य आहेत. अनेक सामाजिक संस्था व साहित्यिक चळवळीत ते सहभागी असतात . अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, जेष्ठ साहित्यिक डॉ श्याम मोहरकर चंद्रपूर, डॉ सुधीर मोते, प्राध्यापक, पत्रकार व साहित्यिक मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये