ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शांतता समितीची बैठक संपन्न

येणारे सर्व उत्सव शांततेत पार पडावे याबाबत सुसंवाद साधून चर्चा

चांदा ब्लास्ट

दि.२५.०८.२०२४ ला पोलिस मुख्यालय चंद्रपूर येथील ड्रिल शेड मध्ये मा.डॉ. दिलीप पाटील भुजबळ विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. एम. सुदर्शन पार पाडता येईल या संदर्भात प्रत्यक्षपणे प्रत्येक तसेच एडिशन पोलिस अधीक्षकल मा. रीना जनबंधु यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शांतता समितीच्या सदस्यान सोबत बैठक संपन्न झाली.

बैठकीत, येणारा गणेश उत्सव व इतर धार्मिक उत्सव संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्त्येक तालुक्यात शांतपणे कसा पार पडता येऊ शकतो या बाबत सुसंवाद साधून चर्चा करण्यात आली. बैठकीला सर्व तालुक्यातील शांतता समिती सदस्य, दक्षता समिती सदस्य, पोलिस पाटील, समाज कार्यकर्ते, ठाणेदार व सहकारी पी एस आय कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बऱ्याच शांतता समिती सदस्यांनी धार्मिक उत्सव पार पडण्याकरिता नियम, नियोजन व कार्य कसे पार पाडून उत्सव शांतपणे पाडता येऊ शकतो याबाबत सुसंवाद साधून चर्चा केली

जिल्ह्यातील सर्व जनतेनी उत्सव एकतेने व शांततेने पार पडण्या करिता जिल्यातील पोलिस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये