ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर परिसंवाद 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : इंदिरा गांधी माहिला महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावर विद्यार्थि आणि प्राध्यापक मिळून दिनांक २६ ऑगस्ट २०२४, सोमवार रोजी परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.शहनाज पठान उपस्थित होत्या. प्रा.प्रगती मेश्राम मॅडम यांनी नवीन शैक्षाणिक धोरणा बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थिनिंच्या एनईपी बाबतच्या शंकांचे निरसन करण्यात आले .

 या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रा.तब्बु यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.अर्चना तुराळे, प्रा.सपना मांढरे, प्रा.पल्लवी नगराळे, प्रारूपाली शेंगोले यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये