Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध धंदेवाल्यांची खैर नाही नवनियुक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन ॲक्शन मोडवर!

सराईत गुन्हेगार व अवैध धंदेवाल्यांवर होणार कडक कारवाई!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महिला व मुलींसाठी पोलीस काका पोलीस दीदी मोहीम

वर्धा – जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले वर्धा जिल्हाचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार तसेच पोलीस दलातील सर्व अधिकारी यांची बैठक बोलावून आदेश पारित केले की जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार जिल्ह्यातील अवैद्य दारू वाहतूक करणारे व अवैध दारू विक्रेते, अमली पदार्थाची तस्करी, जुगार सट्टा चालवणारे तसेच रेती माफिया यांच्यावर पाळत ठेवून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले

  सविस्तर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला तसेच अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक अनुराग जैन त्यांनी निर्देश दिले की जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक व विक्री करणारे अमली पदार्थांची तस्करी करणारे अवैध जुगार व सट्टा चालवणारे रेती माफिया यांच्या वर कठोर कारवाईचे आदेश देऊन तसेच जिल्ह्यातील गॅंग वाईज गुन्हे करणारे गुन्हेगार यांची स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथे परेड घेण्यात आली असता गुन्हेगाराच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही तर त्यांचेवर MPDA/CMCOA अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी यांनी सुद्धा त्यांचे कार्यक्षेत्रातील निर्जन स्थळाचे पाहणी करून पेट्रोल पेट्रोलिंग करण्याचे तसेच महिला व मुलींच्या सुरक्षे संबंधाने पोलीस काका पोलीस दीदी उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय व वस्तीगृहे लगेच 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या पान टपऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस अधीक्षक अनुराग जैन पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मागील ११रा दिवसात अवैध दारू वाहतूक व विक्री संबंधाने जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात छापेमारी सत्र सुरू असून यामध्ये दारूचे अवैध वाहतूक करणाऱ्या सराई 215 दारू विक्रेत्यांवर व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून वाहनासह 85 लाख 88 हजार 350 रुपयाचा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला आहे तसेच वॉश आऊट मोहीम राबवून 14 लाख 48 हजार 670 रुपयाची गावठी मोहा दारू सर्व रसायन नाश करण्यात आला जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रभावीपणे आळा घालण्याचे दृष्टीने संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे व येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये