Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविकास आघाडीत सामिल असलेल्या घटक पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वाट्याला वर्धा विधानसभा मतदार संघ सोडावा!

फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेने वर्धा विधानसभा मतदार संघात आम्ही निवडणूक जिंकू! - महेंद्र मुनेश्वर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांनी वर्धा जिल्ह्यामधील चारही विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी यांच्यातच जागावाटपावरून स्पर्धा सुरू आहे.त्यातही वर्धा विधानसभा मतदार संघात एकमत नाही.वर्धा मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर),सिपिएम,आप सह महाविकास आघाडीतील घटक पक्ष व पुरोगामी संघटनांचे नेते व कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.त्यामुळे आमचा पण दावा या मतदार संघावर आहे.राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाने वर्धा मतदार संघात उमेदवारीसाठी दावा करु नये.वर्धा ची विधानसभा महाविकास आघाडीने सहयोगी घटक मित्र पक्षांना निःस्वार्थ पणे सोडावी.असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)पक्षाचे विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जो पर्यंत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा निर्णय होत नाही तोपर्यंत रिपाइं (ए) तथा आंबेडकरी कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी होणार नाहीत,वर्धेतील शिदोरी आंदोलन हे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याच अजेंड्याचे फसवे सुत्र दिसते.महाविकास आघाडी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वर्धा विधानसभेत जागा मिळवण्यासाठी,घटक पक्ष व पुरोगामी विचाराच्या संघटनावर जाळे टाकत असल्याचा हेतु शिदोरी आंदोलन प्रवर्तकांचा आहे.हे निराशा जनक चित्र आहे.शिदोरी आंदोलनातून शेतकरी कष्टकरी व सामान्य जनतेची मोठी फसवणूक होत आहे.

त्यामुळे सामान्य जनतेचे,शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणान्यासाठी फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेने वर्धा विधानसभा मतदार संघात आम्ही महाविकास आघाडीतील घटक व समर्थक निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत. वर्धा ची जागा आम्ही घटक पक्ष लढू, ती जागा आम्हाला द्यावी अशी महाविकास आघाडीला मागणी आहे.अशी तळमळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये