ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिलेवर अत्याचार झालेल्या व्हिडिओ चित्रीकरण करून प्रदर्शित करणाऱ्या आरोपींना २८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागभीड येथील बस स्थानक मुत्रिघरात बळजबरीने अत्याचार करणाऱ्या नराधमाला चित्रीकरणाच्या आधारावर अप क्रमांक २६२/२४ अन्वये गुन्हा दाखल करून उप विभागीय अधिकारी यांनी तपास करीत मो शेख वय १९, हरी नारायण मांढरे वय ३९, कार्तिक बनकर वय २८, कुणाल पाठक वय १९ ह्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

 यांचेवर भारतीय दंड संहिता कलम ७०(१),६४,२(क),(२) ८७,१२६(२)३,(५) सह कलम ६७ (अ) अन्वये तपास करण्यासाठी मा तालुका न्यायालय नागभीड येथे आरोपींना पुढील तपास करण्यासाठी पोलिस उप विभागीय अधिकारी यांनी पोलीस कोठडी सुनावली असून २८ ऑगस्ट पर्यंत पोलीस तपास करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून उप विभागीय अधिकारी ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे तपास करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये