ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाल वयापासुन भिमराव दिघोरे तमाशा फडातुन करतो समाज जागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्यातील भालेश्वर येथील शाहीर भीमराव दिघोरे हा तरुन तमाशा फडातुन करतो आहे समाज जागृती चे काम शाहीर भिमराव दिघोरे याला लहान पणापासुन नाटक,दंडार,भजन, किर्तन,पोवाडे,नकला,व तमाशा ची आवड असल्याने तो तमाशा फडात गायण करण्यासाठी जात होता.नंतर त्याने गोविंदा भोयर आरमोरी,सोनु मांडारकर खोडशीवणी,योगेश हारमी कुरखेडा,शुभारंभ चहांदे भीवापुर,बाळु मेश्राम चोरटी,कोटेश्वर राऊत अ-हेरनवरगाव,दयाराम खटुले आदींना एकत्र आणुन जय तुर्रा प्रकाश गायन पार्टी नावाने तमाशा फड तयार करुन तालुक्यात नव्हे अनेक जिल्ह्यांत दर्गा उत्सव,गणपती उत्सव,मंड ई उत्सवात दुय्यमी खडा तमाशा कार्यक्रमातुन तरुणांना जडलेल्या व्यसनेधीनतेने विक्रुत बुद्धी,बुवा बाजी,अंधश्रध्देवर,तर कधी महीला वर होणा-अत्याचारावर,व समाजात घटणा-या सत्ये घटणेवर आपल्या शाहीतुन जनजागृती वर आयुष्य भर समाज प्रबोधन करण्याचे काम सुरु असतांनाच उतरत्या वयात म्हातारपणी उपाशी राहुन समाज प्रबोधन करणे शक्य नसल्याने म्हातारपणी जगायचे हा ज्वलंत प्रश्न भीमराव दिघोरे समोर उभा ठाकला असुन सदर हा कलाकार शासनाच्या मानधानाच्या प्रतीक्षेत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये