Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील अपंग कर्मचाऱ्यांची चौकशी करा : ऍड. युवराज धानोरकर

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

राज्यात पुजा खेडकर प्रकरण चांगलेच गाजत आहे. हे पाहता चंद्रपूर जिल्ह्यातही खोटे अपंगत्व प्रमाणपत्र सादर करुन त्यावर शासकीय तथा निमशासकीय क्षेत्रांमधे नोकऱ्या बळकावल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही.असे असल्यास तो खऱ्या अपंगावर अन्याय आहे.त्यामुळे जिल्ह्यात शासकीय तथा निमशासकीय क्षेत्रातील अपंग उमेदवारांच्या कागदपत्रांची चौकशी व अपंगत्वाची तपासणी करावी.व यात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर यांनी केली आहे.त्यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटातर्फे दिनांक २३ला चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे.जिल्ह्यात शासकीय तथा निमशासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात अपंग कर्मचारी कार्यरत आहे.मात्र यात तर तोतये अपंग असेल तर तो खऱ्या अपंगावर अन्याय असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. निवेदन सादर करतांना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर, विधानसभा संघटक नरेश काळे, चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी, दिपक कामतवार,जिल्हा वाहतूक प्रमुख अरविंद धिमान, युवा सेना जिल्हाप्रमुख विनोद बुटले आदी ऊपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये