क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार प्रवीण आक्केवार हा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे ताब्यात

जिल्ह्यातील घरफोडीचे 02 गुन्हे उघडकीस व बाहेर जिल्हयातील 02 गुन्हे केल्याची माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत या प्रमाणे आहे की, दि 08.06.23 रोजी पो स्टे रामनगर येथे अप क्रं 514/23 कलम 454, 457,380 भा द वि चा फिर्यादी सुनील धोबे रा वृंदावन नगर वर्धा यांचे तक्रारी वरून दाखल आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्याकडून करीत असतांना स्थागुशा चे पथक पेट्रोलिंग करीत असताना यातील *आरोपी अट्टल घरफोडीचे गुन्हे करणारा प्रवीण विनायक अक्केवार, वय 55 वर्ष, रा. ऐकुरी वार्ड, राजकला टॉकीज जवळ, चंद्रपूर तहसील जिल्हा चंद्रपूर* हा वर्धा परीसरात संशयास्पद रित्या फिरत असताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याचे ताब्यातील बॅगची व अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून 1) गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या एक लोखंडी टॉमी किंमत – 1,00/-₹,2) पिवळ्या धातूंचे दागिने व पांढरा धातुचे शिक्के, 3) घरांचे दारे व अलमारी उघडण्याकरिता वापरात येणाऱ्या चाब्या 23 नग किंमत 00/-₹,4) एक अँड्रॉइड मोबाइल किंमत 20,000/-₹,5) एक साधा मोबाईल की 1, 000रू, 6) नगदी 1,328/-₹असा एकूण 22,428/- रू. चा माल. मुद्देमाल मिळून आल्याने तो मोका जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करून आरोपीस त्याचे ताब्यातील चोरीच्या मालाबाबत त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची माहिती दिली तसेच त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपुस केली असता त्याने 01 महिन्यापूर्वी वर्धा येथे येऊन पो.स्टे. सावंगी मेघे अप. क्रमांक – 266/23 कलम 454,457, 380 भा.द.वि गुन्हा केल्याची माहिती दिल्याने आरोपीकडून *एकूण 02 घरफोडीचे गुन्हे उघडकीस* आणून आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन रामनगर येथे दि. 10/06/2023 चे 01.26 वा. सा. क्र. 04/23 अन्वये अटक करून ताब्यात दिले.
सदर आरोपी हा अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार आहे. त्यांचेकडून पो स्टे अभिलेखवरील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीवर चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहे. तसेच आरोपी याने *पो स्टे वणी जिल्हा यवतमाळ येथील 02 गुन्हे* केल्याची माहिती दिली आहे.
करिता माहितीस सादर.
सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड सर यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, यशवंत गोल्हर, राजेन्द्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, गोपाल बावनकर, यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये